kssparikrama
HomeDatt Janmasthan Ansuya Yatra
Datt Janmasthan Ansuya Yatra_Advance Payment
Datt Janmasthan Ansuya Yatra_Advance Payment

Datt Janmasthan Ansuya Yatra

 
₹10,500
Options:
Advance Payment
Advance Payment
Direct Haridwar Full Payment
Mumbai Senior Citizen Full Payment
Mumbai Full Payment
Quantity:
1
Product Description
यावर्षी दत्त जयंती हिमालयामध्ये श्रीदत्त जन्मभूमी ऋष्यकूल पर्वतावर साजरी करा.

दत्त जन्मस्थान अनसुया (हिमालय) यात्रा

देवभूमी हिमालयातील अद्भुत अनुभूती

कालावधी : ९ दिवस : दि. १८ ते २६ डिसेंबर २०१८

शुल्क: रु. २०६००/- मुंबई ते मुंबई रु. १७०००/- हरिद्वार ते हरिद्वार

देवभूमी उत्तराखंडमध्ये चमोलीजवळ अनसुया हे ठिकाण आहे. हा परिसर ऋष्यकूल पर्वत म्हणून ओळखला जातो. श्रीदत्तात्रेयांचा जन्म इथेच झाला अशी श्रद्धा आहे. याठिकाणी अत्यंत प्राचिन अशी अत्रि गुंफा आणि अनसुया मंदिर आहे. याच ठिकाणी अत्रि ऋषींचा आश्रम होता. अनसुयेचे गर्वहरण करण्यासाठी आपापल्या पत्नींच्या आग्रहावरून ब्रह्मा, विष्णू आणि महेश इथे आले आणि त्यांनी अनसुयेला निर्व:स्त्र होवून भिक्षा वाढण्याची मागणी केली. अनसुयेच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने त्या तिघांचेही सहा महिन्याच्या बालकांमध्ये रूपांतर झाले आणि त्यातून पुढे चंद्र, दुर्वास आणि श्रीदत्तात्रेयांचा जन्म झाला असा कथाभाग आहे. दत्तजयंती निमित्त येथे मोठा मेळा भरतो आणि अनुपम असा डोली पालखी सोहळा होतो. अवर्णनीय आणि अद्भूत अशा हिमालयीन पहाडी सौंदर्या बरोबरच या निमित्ताने पहाडी जीवनाचेही अनोखे दर्शन घडते. देवभूमी हिमालयातील ही एक अद्भुत दत्तानुभूती आहे. अत्रि ऋषी, अनसुया माता आणि भगवान दत्तात्रेय यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या भूमीमध्ये प्रत्यक्ष गंगा अवतरली आहे. तिथेच त्रिपिंडी शिवलिंग आहे. कमंडलूच्या आकाराचा १९५० फूट लांबीचा गंगेचा अद्भूत धबधबा आहे. या परिक्रमेमध्ये एकूण फक्त २० कि.मी एवढे अंतर चालावे लागते. घोड्याची व्यवस्था त्यांचे अधिकीचे शुल्क देवून करता येते.

      कर्दळीवन सेवा संघाने १८ ते २६ डिसेंबर २०१८ यादरम्यान मुंबई किंवा हरिद्वार पासून दत्त जन्मस्थान अनसुया यात्रा आयोजित केली आहे. हा प्रवास मुंबई ते हरिद्वार ३एसी रेल्वेने आणि हरिद्वार पासून पुढे टेंपों ट्रॅव्हलर किंवा टाटा सुमोमधून करायचा आहे. याचबरोबर अनसुया यात्रेनंतर आपल्याला भारतातील स्वित्झर्लंड चोपता या ठिकाणी हिमालयाच्या अद्भुतरम्य निसर्गाचे दर्शन होते. याचबरोबर आपण उखीमठ आणि ओंकारेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेतो. या संपूर्ण परिक्रमेचे शुल्क सर्व खर्चासहित मुंबई ते मुंबई रू. २०,६००/- एवढे आहे. मुंबई ते मुंबई येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी - रु. १९०००/-. रेल्वे चे कन्फर्म तिकिट मिळण्यासाठी कृपया त्वरित नोंदाणी करावी. डायरेक्ट हरिद्वार येथे सहभागी होणाऱ्या यात्रींसाठी रु. १७०००/- एवढे शुल्क आहे.
Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Payment types
Create your own online store for free.
Sign Up Now